श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ
ट्रस्ट | पुणे
Client Name: श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ | shrimantazadmandal.in
भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी दिवशी श्रीगणेशाची पुजा संस्कृत व पौराणीक मंत्रांनी केल्यास सात्वीक आनंद मिळतो . दुखं हरण होवून जीवन सुख संपन्न बनते, मंगलमुर्ती गणेश हि विदयेची, समृद्धी व ऐश्वर्याची देवता आहे, म्हणून श्रीगणेशाला अग्र पुजेचा मान आहे.
माणूस आणि परमेश्वर यांचे नाते अनादी आणि अतूट आहे.माणसाच्या अंत:करणात सुद्धा देव आणि श्रद्धा आहे म्हणून माणसाला घरातही देवघर लागते. जे बेघर असतात ते झाडाखाली देखील आसरा तयार करतात, त्या आसरयामध्ये पहिले स्थान देवाला असते, त्यामध्ये त्याची अंत:करणातून निर्माण होणारी भक्ती असते.म्हणूनच माणूस रोज देवाची पूजा, आरती, नैवेद्य यामधून समाधानी होतो.
पण माणसाला फक्त देवाचे वेड असून चालणार नाही, त्याला जगाचे जीवनाचे, समाजबांधवाचे पण वेड हवे. देवाने माणसात यावे आणि माणसाने देवासारखे व्हावे असे अनेक पुण्यपुर्षाना वाटते. देव आणि माणूस यांची जवळीक साधणारा देवमाणूस म्हणजे "लोकमान्य टिळक "
Related Projects
Overview